बघा.! वाढती उन्हाची तीव्रता आणि कलिंगड परिणाम आणि उपाय
🍉 कलिंगड पिकावर उन्हाच्या तीव्रतेचा परिणाम उन्हाळ्यात तापमान 38–42°C पेक्षा जास्त गेल्यास Watermelon (कलिंगड) पिकावर खालील गंभीर परिणाम दिसतात: 1️⃣ फुलगळ व फळधारणा कमी नर-मादी फुलांचे संतुलन बिघडते परागकणांची जिवंतता कमी होते लहान फळे गळून पडतात 2️⃣ सनबर्न (फळ करपणे) थेट उन्हामुळे फळाच्या सालीवर पांढरे/तपकिरी डाग त्या भागात साली पातळ होऊन आतून मऊ पडते बाजारमूल्य घटते 3️⃣ वाढ खुंटणे पानं करपतात, वेली सुकू लागतात प्रकाशसंश्लेषण कमी → फळांचा आकार लहान 4️⃣ साखर प्रमाण कमी जास्त तापमानामुळे गोडवा ( Brix ) कमी होतो चव फिकी लागते 5️⃣ पाण्याची तीव्र कमतरता माती लवकर कोरडी फळात भेगा (cracking) पडण्याची शक्यता आकार अनियमित होतो .......................................................................................................................................................................... 🌿 बचावासाठी उपाय ✅ ठिबक सिंचन + सकाळ/संध्याकाळी पाणी ✅ प्लास्टिक मल्चिंग (विशेषतः सिल्व्हर- ब्लॅक) ✅ फळांना थेट माती/उन्हाचा संपर्क टाळण्यासाठी गवत/पेंढा ठेवणे ✅ 0:0:50 किंवा पोटॅशयुक्त खत योग्य ...